शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:06+5:302021-06-16T04:20:06+5:30

जागतिक रक्तदान दिनानिमित्त सिडकोतील विजयनगर येथे आयोजित रक्तदान शिबिर शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते व ...

Blood donation camp on behalf of Shiv Sena | शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

Next

जागतिक रक्तदान दिनानिमित्त सिडकोतील विजयनगर येथे आयोजित रक्तदान शिबिर शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यानंतर कोविडकाळात परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे ड्रेनज कर्मचारी समाधान पवार, संतोष गायकवाड, मनोज बागूल, संतोष शिंदे, अनिल गायकवाड, सागर बागूल आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. त्यावेळी घोलप बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख सुयश पाटील यांनी केले होते.

आतापर्यंत ३३ शिबिरांद्वारे १६१० रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून, यामुळे जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा दूर होण्यास मदत होईल, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, महानगर संघटक योगेश बेलदार, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, बालम शिरसाठ, वाहतूक सेना संघटक शिवाजी भोर, रमेश उघडे, विरेंद्रसिंग टिळे, महिला पदाधिकारी अलका गायकवाड, कीर्ती जवखेडकर, पवन मटाले, नीलेश साळुंखे, जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाकसरे आदी उपस्थित होते.

चौकट.

शिबिरात विवेक चौधरी, सागर रणधीर, दीपक चव्हाण, भूषण भोई, मंगेश माळी, अमोल शिरसाट, राहुल पेलमहाले, रोहित जायस्वाल, संजय पुरी, योगेश शेळके, अभिमन्यू जयपूर, मनीष विश्वकर्मा, अमोल गांगुर्डे, राहुल पवार, दीपक सूर्यवंशी, ऋषिकेश शिंदे, वैभव परदेशी, शुभम मते, परवेज शेख, निखिल शिंदे, दीपक महाजन यांसह ४३ जणांनी रक्तदान केले.

फोटो ओळी

ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्याचा सत्कार करताना शिवसेना उपनेते बबन घोलप, सुधाकर बडगुजर यांच्यासमवेत अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, योगेश बेलदार, सचिन मराठे, महेश बडवे, नाना पाटील आदी. (फोटो १५ सिडको)

Web Title: Blood donation camp on behalf of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.