पोलिस कर्मचार्‍यांतर्फेयेवल्यात रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 07:00 PM2020-12-31T19:00:32+5:302020-12-31T19:00:59+5:30

येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Blood donation camp organized by police personnel | पोलिस कर्मचार्‍यांतर्फेयेवल्यात रक्तदान शिबीर

पोलिस कर्मचार्‍यांतर्फेयेवल्यात रक्तदान शिबीर

googlenewsNext
ठळक मुद्देशहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन

येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आबासाहेब पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण प्रमुख उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूषण शिनकर, सचिन सोनवणे, संजय सोमासे, नगरसेवक रूपेश लोणारी, मयूर मेघराज, किरण परदेशी, अतुल घटे, विजय गोसावी, मकरंद तक्ते, डॉ. संकेत शिंदे, राहुल लोणारी, योगेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp organized by police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.