एबीएच डेव्हलपर्सच्या प्रकल्पात आज रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:07+5:302021-07-08T04:12:07+5:30
नाशिक : येथे गुरुवारी (दि. ८) गंगापूर रोडवरील एबीएच डेव्हलपर्स प्रकल्पात रक्तदान शिबिर पार पडणार आहे, तर शुक्रवारी (दि.९) ...
नाशिक : येथे गुरुवारी (दि. ८) गंगापूर रोडवरील एबीएच डेव्हलपर्स प्रकल्पात रक्तदान शिबिर पार पडणार आहे, तर शुक्रवारी (दि.९) राजीव गांधी भवन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना कार्यालय आणि सातपूरला ईएसडीएस कंपनी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही शिबिरे होणार आहेत.
‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारी (दि. ५) एकूण तीन रक्तदान शिबिरे झाली. त्यात सिन्नरला झालेल्या शिबिरात ३१, महिंद्रा ईपीसी एरिगेशन वर्कर युनियनमध्ये १५ तर नामपूरला ९ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. याप्रमाणे एकूण ५५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले आहे.
-------------------
फोटो कॅप्शन (०७ईपीसी)
महिंद्रा ईपीसी एरिगेशन वर्कर युनियनद्वारे रक्तदानानंतर प्रमाणपत्र वितरणप्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना उपमहानगर प्रमुख सुभाष गायधनी, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, प्रदीप पताडे, महिंद्रा एपीसी एरिगेशन लिमिटेडचे ऑपरेशन हेड मिलिंद खापरे, डेप्युटी मॅनेजर सुनील पाथरकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस सुनील यादव, सहचिटणीस नितीन विखार, रवी आहेर, सुनील झोपे, शांताराम शेलार, राजाराम धात्रक, कंपनीतील कामगार संजय चौधरी, योगेश चौधरी, अंबादास बोराडे, संजय निकम, दिगंबर चौधरी, बबन येवले, राजाराम धात्रक, वाय. एस. जाधव, शांताराम शेलार, सुनील झोपे, दगडू कोष्टी, जयंत दुबे, शरद बडगुजर, हिरामण पोरजे आदी.
--------
फोटो (०७ सिन्नर डगळे)
'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत सिन्नर येथे नगरपालिका आवारात रक्तदान करताना नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण डगळे.
फोटाे (०७ सिन्नर)
सिन्नर येथे रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
------------------
फोटो (०७ नामपूर )
नामपूर येथे रक्तदान करताना नागरिक.