चांदगावला लग्न समारंभात रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:16 AM2018-05-11T00:16:26+5:302018-05-11T00:16:26+5:30
येवला : चांदगाव येथील एका विवाहसोहळ्यास रक्तदानाने प्रारंभ झाला. नववधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान केले, त्यानंतर या दाम्पत्याचे लग्न लागले.
येवला : चांदगाव येथील एका विवाहसोहळ्यास रक्तदानाने प्रारंभ झाला. नववधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान केले, त्यानंतर या दाम्पत्याचे लग्न लागले. शिवसेना नेते संभाजी पवार यांनी आता विवाह सोहळ्यातून समाजसेवेचा संदेश जावा अशी भूमिका घेऊन निखिल-माया या वर-वधूसह साळवे व राऊत परिवाराला कल्पना सुचली. ही कल्पना दोन्ही परिवाराने उचलून धरली आणि लग्नसोहळ्याला सामाजिक उपक्र माचे स्वरूप आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात ६३ पेक्षा अधिक वºहाडी मंडळीनी रक्तदान केले. संजीवनी ब्लड बँक यांच्या माध्यमातून या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला. विवाह सोहळ्यातील अनोखा उपक्रम बघून आलेल्या नातेवाईक, आप्तेष्ट मंडळीने दोन्ही परिवारांचे कौतुक केले. येवला तालुक्यातील चांदगाव येथील राऊत वस्तीवरील हा विवाह समारंभ आगळा वेगळा ठरला. येवला पंचायत समितीच्या सभापती आशा साळवे व कृउबा संचालक कांतिलाल साळवे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात नववधू-वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान केले. त्यानंतर विवाह संपन्न झाला. रक्तदानाविषयी जनतेमध्ये प्रबोधन व्हावे, ग्रामीण भागातील जनतेत रक्तदानाविषयी असणारा गैरसमज दूर व्हावा, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे यावेळी दोन्ही परिवारांकडून सांगण्यात आले.