सप्तशृंगगडावर पाळ्यातील इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:46 AM2018-04-07T00:46:01+5:302018-04-07T00:46:01+5:30

कळवण/वणी : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी (दि. ३१ मार्च) सप्तशृंगगडावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता.

The blood of the saptashrangadera blood | सप्तशृंगगडावर पाळ्यातील इसमाचा खून

सप्तशृंगगडावर पाळ्यातील इसमाचा खून

Next
ठळक मुद्देमयत सोनवणे व आरोपी यांच्यात शिवीगाळ होऊन भांडणसोनवणे यांचा मृत्यू झालाची कबुली आरोपींनी दिली

कळवण/वणी : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी (दि. ३१ मार्च) सप्तशृंगगडावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. तो कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथील प्रभाकर राजाराम सोनवणे या इसमाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी या प्रकरणाचा तपास करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या संशयित तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी एका इसमास लाकडी दांडका व कटरने वार करून त्याला जिवे ठार मारल्याची कबुली दिली. मयत प्रभाकर सोनवणे हा पौर्णिमेच्या रात्री नांदुरी रोडवर शिरसमणी फाट्यावर त्याची मोटारसायकल उभी करून उभा होता. यावेळी संशयित तिघा आरोपींनी तू कुठला आहेस, अशी विचारणा केली, यानंतर मयत सोनवणे व आरोपी यांच्यात शिवीगाळ होऊन भांडण झाले. आरोपी सुमित देवरे याने मयाताचा मोबाइल हिसकावून सर्वांनी नांदुरकडे पळ काढला. सोनवणे यांनी माझा मोबाइल द्या अशी मागणी करून दुचाकीने पाठलाग केला. याचा राग येऊन संशयित विशालने कटरने सोनवणे यांच्या अंगावर वार केले तर अन्य साथीदारांनी दांडक्याने मारहाण केली, यात सोनवणे यांचा मृत्यू झालाची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैत्र पौर्णिमेला पाळे येथील काही तरूण देवीच्या दर्शनाला गडावर आले होते. त्यांचा प्रभाकर सोनवणे यांच्याबरोबर वाद झाला होता. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित तरुण विशाल समाधान शिंदे (रा. कळवण), सुमित कैलास देवरे (रा. कुंडाणे), ऋषिकेश विलास जाधव ( रा. पाळे) यांना ताब्यात घेतले.

Web Title: The blood of the saptashrangadera blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा