रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:50 PM2020-02-28T14:50:54+5:302020-02-28T14:52:30+5:30
कळवण : - कळवणच्या उपजिल्हा रु ग्णालयाच्या सन २००६ च्या स्थापनेपासून आजपर्यंत ६५०० रक्तपिशव्यांचा रु ग्णांना पुरवठा केल्याने उपजिल्हा रु ग्णालय रु ग्णांना संजीवक ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रु ग्णालयासाठीच्या नियमानुसार व अन्न व औषध प्रशासनाच्या रक्त साठवणूक केंद्र स्थापनेसाठी आवश्यक निकषांनुसार येथील उपजिल्हारु ग्णालयात २००६ साली केंद्र कार्यान्वित करण्यात आले .
कळवण:उपजिल्हा रु ग्णालयातील साठवणूक केंद्रात पुरेसा रक्तसाठा
आदिवासी क्षेत्रातील या रु ग्णालयात रु ग्णसंख्या मोठी असून रु ग्णामध्ये पूरक आहाराचा अभाव , आरोग्यबाबतची उदासीनता यामुळे रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळते . शेतीकामात व्यस्त असलेल्या माता बऱ्याच वेळा उशिराने रु ग्णालयात दाखल होत असतात . त्यातही रु ग्णालयापर्यंतचा गरोदर मातांचा प्रवास दुर्गम भागातील रस्त्यांमुळे खडतर होत असतो . रु ग्णालयात होणाº्या प्रसूतींमध्ये जोखमीच्या प्रसूतींचे प्रमाण अधिक आहे . प्रसूतीदरम्यान अधिकच्या रक्तस्रावामुळे माता दगावण्याची शक्यता वाढते . अशा वेळी रु ग्णालयातील रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक ठरत आहे.
. सिझेरियन करताना रक्त साठवणूक केंद्र आधारभूत ठरत असल्याचे भुलतज्ञ डॉ. सारिका चव्हाण यांनी सांगितले .
कळवण येथील हे केंद्र कळवण तालुल्यातीलच नाही तर कार्यक्षेत्राबाहेरील जवळच्या देवळा , डांगसौंदाणे ता सटाणा , खर्डे येथून संदिर्भत होणाºया मातांसाठी जीवनदायी सिद्ध होत आहे .
रक्त साठवणूक केंद्रास जिल्हा शासकीय रु ग्णालयातील रक्त पेढीतून रक्त पिशव्या उपलब्ध होत असतात . यासोबतच रु ग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ उदय बस्ते हे रक्त पिशव्यांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात .कळवण तालुका हा गुजरात राज्याच्या जवळ असल्याने रस्ते अपघातातील जखमींची संख्या मोठी असते , यास्तव परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी केले आहे .वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व श्री गुरु दत्त शिक्षण संस्था मानूर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने एक कॅलेंडर वर्षात ६ शिबिरे आयोजित करण्यात येत असतात ज्यातून सरासरी ५०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असते .