तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

By admin | Published: June 1, 2015 12:26 AM2015-06-01T00:26:49+5:302015-06-01T00:27:11+5:30

तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

The blood of the youth; Police attack police | तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

तरुणाचा भोसकून खून; जमावाचा पोलिसांवर हल्ला

Next

  नाशिक (प्रतिनिधी)- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शैलेश दत्तात्रय सासे (२५) रा. भोई गल्ली या तरुणाचा एका टोळक्याने तीष्ण हात्याराने भोसकून निर्घून खून केल्याची घटना साठे चौकातील किटकॅट पॉइंट येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जिल्हा रूग्णालयात तोडफोड केली तर पोलिसांवरही हल्ला केला. या हल्लयात सहायक पोलीस उपायुक्त रविंद्र्र वाडेकर हेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शैलेश सासे हा रात्रीच्या सुमारास किटकॅट पॉइंट येथे आला असतांना तरुणांच्या एका टोळक्याने शैलेश यास रागाने का पाहतोस असे म्हणत कुरापत काढली. यातून वाद वाढत गेला आणि या वादाचे पर्यावसन हाणामरीत झाले. या हाणामारीत टोळक्याने शैलेशवर तीष्ण हात्याराने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटना भोई गल्लीतील नागरिकांना समजताच जिल्हा रूग्णालयात मोठा जमाव चाल करून आला. त्यांनी जिल्हा रूग्णालयात तोडफोड करीत दगडफेक करीत काचा फोडल्या. यामध्ये आवारातील अनेक वाहनांचे नुकसान झाले. रूग्णालायातील आपतकालीन कक्षाचेही नुकसान झाले. रूग्णालयातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत रुग्णालयातील महत्वाचे कक्ष तातडीने बंद करून घेत स्टाफचाही बचाव केला. रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांवरही जमावाने दगडफेक केली. याचवेळी संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिस आले असता जमावाने पेव्हरब्लॉक आणि विटांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये सहायक पोलीस उपायुक्त रविंद्र वाडेकर यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले. जिल्हा रूग्णालयात संतप्त जमाव उग्र झाला असतांनाच किटकॅट पॉइंट येथेही जमाव जमल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: The blood of the youth; Police attack police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.