पाचवर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून

By admin | Published: May 21, 2017 12:27 AM2017-05-21T00:27:16+5:302017-05-21T00:27:45+5:30

आजीसह पित्यावर गुन्हा

Bloody murder by a five-year-old girl | पाचवर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून

पाचवर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी/वणी : दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे पाचवर्षीय बालिकेवर जन्मदात्या पित्याने दारूच्या नशेत अत्याचार करून नात्याला काळिमा फासला. ही घटना उघड होऊ नये म्हणून आजीनेच नातीचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान झोपेत आपल्या कुशीतून मुलीला उचलून नेत अत्याचार व खून केल्याचा बनाव आजीने रचला; मात्र पोलिसांनी काही तासात या घटनेचा पर्दाफाश करीत नराधम पिता व आजी यांना ताब्यात घेतले आहे.
जवळके वणी येथे संशयित आरोपी सचिन अशोक शिंदे (२४) हा रात्री लग्नाच्या वरातीतून दारू पिऊन आला. त्याने आपल्या आईजवळ म्हणजेच पीडितेच्या आजी जवळ झोपलेली पोटच्या ५ वर्षीय मुलीला झोपेतच उचलून नेले व बाजूच्या खोलीत या चिमुरडीवर अत्याचार केला. सदर प्रकार आजी अनुसया हिच्या लक्षात आला. घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिने पीडित चिमुरडीची गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह जवळच असलेल्या शाळेच्या पाठीमागे फेकून दिला. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह पुन्हा घरी आणला व चुलत भावास बोलावून पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा बनाव केला. त्यानंतर आजी अनुसया अशोक शिंंदे (४८) हिने पोलिसांत धाव घेऊन कुणीतरी अज्ञात आरोपीने माझ्याजवळ झोपलेल्या पाचवर्षीय नातीला झोपेतून उचलून नेले व शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची बनावट फिर्याद दिली. या फिर्यादीवरून वणी पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२, ३७६ (१), २०९, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपासात श्वानपथकाने मृतदेह पडलेल्या ठिकाणापासून पीडित मुलीच्या घराचीच दिशा दाखवल्याने पोलीस तपासाला वेगळे वळण मिळाले. कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी सचिन शिंदे याने केलेल्या कूकर्माची कबुली दिली. त्यानंतर संशयित आरोपी सचिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.एल. पवार करीत आहेत.पीडित मुलीच्या आई व वडिलांमध्ये वाद होऊन आई माहेरी राहत होती तर चिमुरडी वडील व आजीकडे राहत होती.

Web Title: Bloody murder by a five-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.