रक्षाबंधनासाठी बहरला बाजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:52 AM2020-08-03T00:52:17+5:302020-08-03T00:52:52+5:30
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण सोमवारी आल्यामुळे रविवारी बाजारपेठ बहरल्याचे चित्र दिसून आले. पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात पुन्हा चैतन्य परतल्यासारखे दिसू लागल्याने व्यावसायिकांनादेखील काहीसा दिलासा मिळाला.
नाशिक : नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण सोमवारी आल्यामुळे रविवारी बाजारपेठ बहरल्याचे चित्र दिसून आले. पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात पुन्हा चैतन्य परतल्यासारखे दिसू लागल्याने व्यावसायिकांनादेखील काहीसा दिलासा मिळाला. सणाच्या आधी आलेले शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस बाजारात भगिनीवर्गाची विशेष उपस्थिती दिसून आली.
संपूर्ण देश जरी जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कॅलेंडरवर चालत असला तरी बाजार हा नेहमीच भारतीय कालगणनेच्या चैत्र ते फाल्गुन या तिथ्यांवरच चालतो, हे पुन्हा राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
भारतीय जनमानस हे सण-उत्सवाच्या कालावधीत आपसूकपणे खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्याच तिथींच्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात चैतन्य पसरते. रक्षाबंधनातून या चैतन्याची चुणूक दिसून आली.