बेमोसमी पावसात क्विंटल कांदा भिजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:39 AM2019-02-14T00:39:04+5:302019-02-14T00:41:24+5:30
पाटोदा : पाटोदा आणि परिसरात सोमवारी (दि.१२) मध्यरात्री झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. हा कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचा द्राक्षबागांनाही फटका बसला असल्याने बागायतदार व कांदा उत्पादक शेतकरी हवालिदल झाला आहे.
पाटोदा : पाटोदा आणि परिसरात सोमवारी (दि.१२) मध्यरात्री झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजला आहे. हा कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचा द्राक्षबागांनाही फटका बसला असल्याने बागायतदार व कांदा उत्पादक शेतकरी हवालिदल झाला आहे.
पाटोदा, ठाणगाव, विखरणी, कातरणी, कानडी, विसापूर, आडगाव रेपाळ या भागात मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतात विक्रीसाठी तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. यात हजारो क्विंटल कांदा भिजला असून, कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या कांद्यास कवडीमोल भाव मिळत असून, पुढील दिवसात भावात सुधारणा होईल या आशेने शेतकºयांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र भिजलेला कांदा दोन-चार दिवसांत मिळेल त्या भावात कांदा विकावा लागणार आहे. या पावसाचा द्राक्षबागांनाही फडका बसला आहे. पाऊस व गारांमुळे द्राक्षमणी गळण्याची तसेच फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकºयांसह बागायतदार हवालदिल झाला आहे.शेतात सुमारे तीन एकर कांदा लागवड केलेली असून, कांदा तयार करून पोळी मारून ठेवलेला आहे. मात्र रात्री आलेल्या बेमोसमी पावसामुळे जवळ जवळ माझा दोन हजार क्विंटल कांदा पावसामुळे भिजला आहे. कांदा झाकण्यासाठी प्रयत्न केले मात्र वाº्यामुळे कांदा झाकण्यात अडथळा आल्याने संपूर्ण कांदा भिजला. कांदा सडण्याची शक्यता असून, आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
- सोमनाथ शेळके, कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगावबेमोसमी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतात तयार असलेला हजारो क्विंटल तयार कांदा मोठ्या प्रमाणात भिजल्यामुळे सडणार आहे. त्यामुळे भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना भरपाई देऊन दिलासा द्यावा.
- ज्ञानेश्वर बोरणारे, पाटोदा