तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला विद्यार्थ्यांचे समुमदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:16 PM2019-06-07T16:16:11+5:302019-06-07T16:17:55+5:30
दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे.
नाशिक : दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे.
व्यावसायिक शिक्षणातील करिअरचा पर्याय म्हणून अनेक विद्यार्थी दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक डिप्लोमा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी डिप्लोमानंतर लघू उद्योगांसह मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने अजूनही विद्यार्थी या क्षेत्राकडे सकारात्मतेने पाहतात. त्याच्या या सकात्मकतेला निर्णयात परीवर्तीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. नाशिक, औरंगाबादसह राज्यभरातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयांत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात येणार असून यात तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि एमसबीटीईचे संचालक डॉ.विनोद मोहीतकर यांचे तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तंत्र शिक्षण मंडळाचे सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांनी केले आहे. यात दहावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेनतन महाविद्यालयासह सर्वच तंत्रनिकेतनमध्ये हा कार्यक्रम दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रादेशिक महाविद्यालयांनाही मार्गदर्शन
तंत्रशिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.७) उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह,धुळे,नंदूरबार,जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातील सुमारे १२५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना डीटीईचे सहायक संचालक प्रा. संजय पगार व प्रा.लक्ष्मीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.