सिन्नरच्या भैरवनाथ नागरी पतसंस्थेवर प्रशासक मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:46 PM2020-07-02T20:46:59+5:302020-07-02T22:52:10+5:30
सिन्नर : येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली असून, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने यांनी नव्या त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षक एस. टी. शिंदे अध्यक्ष तर विमल वस्र भांडारचे संचालक संजय चोथवे व नायगाव येथील गोदा युनियन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सांगळे सदस्य म्हणून या प्रशासक मंडळाचा कारभार पाहणार आहेत.

पतसंस्थेच्या प्रशाकीय इमारतीत सिन्नरचे सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांनी गुरुवारी (दि. २) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाकडे पदभार सोपवला. पतसंस्थेवर रुद्राक्ष यांच्यासह नाशिकच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांचे द्विसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त होते. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे ठेवी मिळत नाहीत, तसेच थकबाकीदार कर्जदारांकडून कर्जवसुली केली जात नसल्याच्या तक्रारी सभासदांकडून वारंवार केल्या जात होत्या. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी लक्ष पुरवून विभागीय सहनिबंधक यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत विभागीय सहनिबंधकांनी द्विसदस्यीय मंडळाला कर्जवसुली व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र, त्यात कोणतीही कार्यवाही न झाल्याने रुद्राक्ष व सौंदाणे यांच्या द्विसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक रद्द करण्यात आली. आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार नव्याने त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी नाशिक जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप कातकाडे, नायगाव येथील सूर्योधन पतसंस्थेचे चेअरमन मोहन कातकाडे, संचालक रामनाथ बोडके आदी उपस्थित होते. पतसंस्थेला ऊर्जितावस्थाथकबाकी असलेल्या कर्जाची वसुली करणे व ठेवीदारांच्या ठेवी विनासायास परत करणे तसेच पतसंस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन प्रशासक मंडळाच्या वतीने सदस्य संजय चोथवे व लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले.