महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर राजकीय पक्षांचे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:41+5:302021-04-25T04:14:41+5:30
शहरातील आराेग्य व्यवस्थेबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी शनिवारी (दि.२४) वैद्यकीय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी त्यावर चर्चा करण्यात ...
शहरातील आराेग्य व्यवस्थेबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी शनिवारी (दि.२४) वैद्यकीय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी त्यावर चर्चा करण्यात आली. येत्या १ मेनंतर अठरा वर्षांवरील नागरिकांना देखील लस देण्यात येणार असल्याने त्यासाठी शहरात लसीकरणाची केंद्रे वाढवावीत, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या.
शहरात डॉ. झाकीर हुसेन आणि नाशिक रोड येथील न्यू बिटको रुग्णालयात स्वच्छतेबाबत काही तक्रारी असल्याने यासंदर्भात त्यांनी डॉ. नितीन रावते आणि डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्याकडून माहिती घेतली. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. सुमारे १६०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५८१ कर्मचारी रुजू झाल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
बिटको रुग्णालयात कोविड चाचणी सुरू झाली असून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याने आता लवकरच दिवसाकाठी पाच हजार नमुने तपासले जातील तसेच आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल आता एका दिवसात मिळू शकतील, अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, संभाजी माेरुस्कर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
इन्फो..
महापालिकेच्या रुग्णालयासाठी घेतलेले सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन तातडीने सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. सिटीस्कॅन मशीन दोन दिवसांत सुरू होणार आहे. एमआरआय मशीनसाठी लवकरच तंत्रज्ञ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.