नारपारला चालना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:46 PM2018-10-03T12:46:24+5:302018-10-03T12:46:36+5:30
सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली .
सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली . बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्याला ३८.६६ दलघफू पाणी आरक्षणाला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गोराणे येथे डॉ.भामरे यांचा सत्कार आयोजित केला होता.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली .ते पुढे बोलतांना म्हणाले की,आघाडी शासनाच्या काळात शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारून बासनात गुंडाळून ठेवलेला हरणबारी उजवा कालवा आम्ही शासकीय मापदंडात बसवून या कालव्यासाठी पाणी आरिक्षत करून आणल याची जाणीव लाभक्षेत्रातील शेतकºयांना जाणीव आहे म्हणून शेतकºयांनी माझा सत्कार ठेवला यामुळे सर्व शेतकºयांचे त्यांनी आभारही मानले.
बागलाण तालुक्यातील शेतकरी प्रचंड स्वाभिमानी आहे.त्याला कुठल्याही सबिसडीची भिक नको असून त्याला केवळ शेतापर्यंत मुबलक पाणी,वीज आण िशेतमालाला रास्त भाव हवा आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक आठ ,केळझर डावा कालवा आणि हरणबारी उजवा कालव्याला मान्यता मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.
बजोटे येथील पाणी परिषदेत हरणबारी उजव्या कालव्यासाठी ३८.६६ दलघफू पाणी आरिक्षत करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले होते ते आपण पाळले. चारु दत्त खैरनार यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.तर नीलिमा देसले,तेजस देसले, आर.डी.देसले, कृती समितीचे अध्यक्ष किशोर ह्याळीज,उपाध्यक्ष डॉ.दिनेश देसले,केशव भदाणे,जिल्हा परिषद सभापती यतींद्र पाटील,डॉ.शेषराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
----------------------------
गुजरात सरकारशी समजोता करार
गेल्या चाळीस वर्षांपासून नार-पार बाबत आपण ऐकून आहोत.मी मंत्री झाल्यानंतर जेंव्हा देशाच्या जलआयोगाच्या अध्यक्षांना भेटलो तेंव्हा त्यांनी मला नार-पार कडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.आगामी एक वर्षांच्या कार्यकाळात गुजरात सरकारशी समजोता करार होणार असून २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नार-पार बाबत जो करार केला होता त्याच्या दीड पट अधिक पाणी आपल्याला मिळणार असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.या कामाचं सर्वेक्षण सुरु असून १४ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लवकरच या माध्यमातून कसमादे सुजलाम सुफलाम होणार आहे.