बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:50 AM2019-01-08T00:50:48+5:302019-01-08T00:51:10+5:30

येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी दहा बोटी सारंगखेड्यातील तापी नदीच्या पात्रात धावत ‘चेतक फेस्ट’ची शान वाढविणाऱ्या ठरल्या.

 Boaty Nashik, Shaan 'Chetak' | बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची

बोटी नाशिकच्या, शान ‘चेतक’ची

Next

नाशिक : येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी दहा बोटी सारंगखेड्यातील तापी नदीच्या पात्रात धावत ‘चेतक फेस्ट’ची शान वाढविणाऱ्या ठरल्या.   शिककरांसाठी ‘बोट क्लब’ कधी सुरू होईल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
पर्यटन मंत्रालयाकडून नाशिकच्या पर्यटन विकासासाठी वारंवार नुसतीच आश्वासने दिली गेली. येथील गोदाआरती, कलाग्रामचा रखडलेला प्रकल्प, भावली धरणाचा विकास, गंगापूरचे बोट क्लब असे सर्वच प्रकल्प जे पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारितीतील आहे ते सगळे रखडले आहे. ‘वेलनेस हब’ची घोेषणा झाली; मात्र त्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची हालचाल होऊ शकलेली नाही. नाशिकच्या पर्यटनाला दिवसेंदिवस खीळ बसत चालली आहे.
नाशिककरांच्या तोंडाला पुसली पाने
पर्यटन मंत्रालयाकडून राज्यात समतोल विकास साधला जावा जेणेकरून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील पर्यटनवृद्धी होईल, अशी अपेक्षा असताना केवळ ठराविक जिल्ह्यासाठी झुकते माप दिले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाशिकचा बोट क्लब सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न होण्याऐवजी या बोट क्लबसाठी खरेदी केलेल्या ४७ बोटींपैकी दहा बोटी थेट नंदुरबारच्या सारंगखेड्याला हलविल्या गेल्या. तेथील ‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये यंदा ‘साहसी जलक्रीडा’ पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेली हेदेखील तितकेच खरे आहे.
कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाणार का?
पॅरासेलिंग, जेट स्कीस्, बनाना, पॅडल बोटींचा समावेश आहे. जेट स्कीस एकूण दहा, तर पॅरासेलिंग दोन उर्वरित बोटी बनाना व पॅडल प्रकारातील आहेत. यापैकी पॅरासेलिंग, जेट स्कीस् या बोटी अत्याधुनिक असून येथील दहा जेट स्कीस् बोटी सारंगखेड्यातील ‘चेतक फेस्टिव्हल’ची शान वाढविणाºया ठरल्या खºया मात्र नाशिकच्या बोट क्लबला मुहूर्त मिळणार का? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
४कॉँग्रेस-राष्टवादीची सत्ता असताना तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून बोट क्लब प्रकल्प साकारला; मात्र सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकल्पाचे लोकार्पण होऊ शकले नाही हे नाशिककरांचे दुर्दैवच. यामुळे प्रकल्पावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात जातो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

Web Title:  Boaty Nashik, Shaan 'Chetak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.