घोटी महामार्गावर आढळला परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह मध्यरात्रीची घटना : वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:18 PM2021-01-02T18:18:13+5:302021-01-03T00:48:25+5:30
घोटी - घोटी परिसरात टोलनाक्याजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या.
घोटी - घोटी परिसरात टोलनाक्याजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या.
शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री ही घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि २) मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक (डब्ल्यू बी २३/ डी- २६०३) हा घोटी महामार्गावर हॉटेल किनारा समोर चालू स्थितीत उभा होता. याच ठिकाणी या ट्रकचा चालक गौतम अरुण दास (वय -६० रा कोलकता, पश्चिम बंगाल) हा महामार्गाच्या कडेला गवतात जखमी अवस्थेत मृत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. नाशिक ग्रामीण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.
याबाबत चालक गौतम अरुण दास याच्या मृतदेहाचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीसांनी आकस्मित मृत्युची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
..............................