केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:00 AM2018-12-16T01:00:45+5:302018-12-16T01:00:59+5:30

केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

The body of the girl found on the bank of the Kelzer dam | केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह

केळझर धरणाच्या काठावर सापडला युवतीचा मृतदेह

Next

डांगसौदाणे : केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
केळझर धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढल्यानंतर येथील पोलीसपाटील जगन देशमुख यांनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सटाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार के. टी. खैरनार, नाईक पंकज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करताना अंगात गाऊन, परकर असे स्त्रीचे कपडे, पायात पैंजण आढळल्याने हा युवतीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. अंदाजे दोन महिन्यांचा कालावधी उलटल्याने मृतदेह कुजल्याने फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची नोंद केली आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरणात असून, ही हत्या की आत्महत्या याची चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार खैरनार, नाईक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
नाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सेवेतून निलंबित केले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा पोलीस ठाण्यात सापळा रचून सूर्यवंशी यास शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले होते़ सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरोधात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास केशव सूर्यवंशी यांच्याकडे होता़ त्यांनी यापूर्वीच संबंधित संशयितास अटकही केली होती़ त्यानंतर आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ सटाणा पोलीस ठाण्यात सूर्यवंशीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन अटक होताच दराडे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत़
रस्त्यावर उभी केलेली मोटारसायकल लंपास
ओझर टाउनशिप : सर्व्हिस रोडलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मंगळवारी सायंकाळी पावणेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खंडेराव कुंडलिक सदगीर, रा. संभाजीनगर ओझर यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १५ ईएम ३२५४) सर्व्हिस रोडवर असलेल्या शिवले कॉम्प्लेक्स समोर उभी करून ते भाजी बाजारात गेले होते.



बाजारातून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण मोटारसायकल मिळून आली नाही. त्यांनी शनिवारी मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्र ार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


या आदेशात निलंबन काळात सूर्यवंशी यांना ग्रामीण पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांकडे दिवसातून दोन वेळा हजेरी तसेच लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे म्हटले आहे़

Web Title: The body of the girl found on the bank of the Kelzer dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.