उडी घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:43 AM2021-12-31T01:43:47+5:302021-12-31T01:44:56+5:30
पत्नीसमवेत कौटुंबीक कारणावरून झालेल्या वादातून पत्नी फारकत घेणार असल्याच्या भीतीपाेटी सोमवारी (दि. २७) रामवाडी पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेणाऱ्या पतीचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी गोदावरी नदी पात्रात रामवाडी पुलाखाली पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंचवटी : पत्नीसमवेत कौटुंबीक कारणावरून झालेल्या वादातून पत्नी फारकत घेणार असल्याच्या भीतीपाेटी सोमवारी (दि. २७) रामवाडी पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेणाऱ्या पतीचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी गुरुवारी (दि. ३०) सकाळी गोदावरी नदी पात्रात रामवाडी पुलाखाली पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी फारकत घेणार, या भीतीपोटीच मूळ नंदुरबार जिल्ह्यातील आणि सध्या लेखानगरला राहणारे दीपक अशोक परदेशी (२७) याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
परदेशी दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक कारणावरुन खटके उडत होते. त्यातूनच प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले होते. सोमवारी दुपारी हे दाम्पत्य रामवाडी पुलावरून जात असताना पुलावर परदेशी यांनी दुचाकी थांबविली. पत्नीला उतरवून दिल्यानंतर त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी मारली होती. त्यानंतर
घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि जीवरक्षकांनी नदीपात्रात संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला होता. मात्र, ते आढळून आले नव्हते. दीपक यास पोहता येत असल्याची माहिती पोलिसांपुढे आल्यानंतर कदाचित ते पोहून बाहेर पडले असावे, असाही कयास पोलिसांनी लावला होता. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी विच्छेदन
करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. पत्नी फारकत घेणार या भीतीपोटी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून केला जात आहे.
--इन्फो--
...म्हणून पोलीसदेखील चक्रावले
मंगळवारी दुपारनंतर शोधमोहीम थांबविण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दीपकच्या पत्नीला पुन्हा विचारणा केली असता तिने आपल्या पतीला नदीपात्रात उडी मारताना आपण पहिलेच नसल्याचा खुलासा केल्याने पोलीस चक्रावून गेले होते.
गुरुवारी सकाळी गोदावरी नदीपात्रात परदेशी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.