बेपत्ता युवकाचा कालव्यात मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 09:55 PM2021-04-01T21:55:52+5:302021-04-02T01:02:24+5:30
वणी : सुरागाणा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह चार दिवसानंतर जोपुळ शिवारातील कालव्यात आढळुन आला असुन मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
वणी : सुरागाणा तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह चार दिवसानंतर जोपुळ शिवारातील कालव्यात आढळुन आला असुन मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
केशव रामा वाघमारे (२२) हा कुकुडमुंडा तालुका. सुरगाणा येथील रहीवाशी असुन जोपुळ शिवारात हल्ली वास्तव्यास होता. तीन दिवसांपुर्वी कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघुन गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
त्याचा तपास केल्यानंतरही त्याचा पत्ता लागला नव्हता. दरम्यान जोपुळ शिवारात तो अंघोळीसाठी गेल्याची माहीती मिळाली होती. त्यावरुन चांदोरी, पिंपळगाव येथील गोताखोर आणुन शोध घेण्यात आला. तसेच धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे अधिकारी यांना ही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी कालव्याच्या पाण्याच्या तळाशी जाऊन केशव याचा मृतदेह बाहेर काढण्यातआला.
मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस आधिक्षक सचिन पाटील व उपविभागीय आधिकारी संदिप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपुत, जगदीश झाडे, शाम राऊत, शशिकांत वाघेरे, सोनटक्के, भोसले, पवार व पथकाने ही कामगिरी केली. अधिक तपास केला ाजात आहे.