शिवपुराण कथा ऐकण्यास गेलेल्या व्यक्तीचा धरणात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:16 IST2025-02-05T16:16:11+5:302025-02-05T16:16:21+5:30
साक्रीपासून २५ किमी अंतरावर अक्कल पाडा डॅममध्ये एक अनोळखी मृतदेह पोलिसांना आढळून आला.

शिवपुराण कथा ऐकण्यास गेलेल्या व्यक्तीचा धरणात आढळला मृतदेह
लोहोणेर : साक्री येथे महाशिवपुराण कथेसाठी गेलेल्या लोहणेर येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह धरणात सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
लोहोणेर येथील दौलत नामदेव जाधव हा इसम ३० जानेवारीला सकाळी साक्री येथे शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्यांची पत्नी कथा ऐकण्यासाठी गेली होती. दोघे पती-पत्नी शिवपुराण कथेच्या ठिकाणी थोडा वेळ एकत्र होते. यावेळी तुम्ही पुढे चला, असे सांगून काही वेळाने दौलत जाधव यांची पत्नी लोहोणेर येथे घरी परतली मात्र दौलत घरी आलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्यांची दौलत जाधव वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी शोध मोहीम चालू केली व साक्री पोलिस ठाण्याला ते हरविल्याची तक्रार नोंदवली.
यादरम्यान साक्रीपासून २५ किमी अंतरावर अक्कल पाडा डॅममध्ये एक अनोळखी मृतदेह पोलिसांना आढळून आला. तो मृतदेह साक्री रुग्णालयात नेण्यात आला. तेथे मयत दौलत जाधव यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो त्यांना सुपूर्द करण्यात आला.