अखेर तिसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:01 PM2019-12-19T18:01:58+5:302019-12-19T18:02:49+5:30
त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि.१९) रेस्क्यु पथकाने विशेष मेहनत घेऊन पाण्याबाहेर काढला.
त्र्यंबकेश्वर : मंगळवारी त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी येथील धबधब्याच्या डोहात बुडालेल्या तिघांपैकी एका युवतीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. तर एक मृतदेह वैनतेय संस्थेच्या पथकाने अथक प्रयत्नातुन बुधवारी उशीरा काढण्यात आला. तर तिसरा मृतदेह गरुवारी (दि.१९) रेस्क्यु पथकाने विशेष मेहनत घेऊन पाण्याबाहेर काढला.
मंगळवारी तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी हॉस्टेल मध्ये राहणारे उप्पाला कोटी रेड्डी २० रम्मिाला पुडी रघुवंशी (२१) अनुषा गोरांतला (२१) गिरीधर आकाश (२०) कैपु व्यंकटेश्वरा रेड्डी २० हे दोघे रा. तेलंगणा काव्या लक्ष शेट्टी (२०) ता. हैद्राबाद तिघे रा. तेलंगणा हे सहाजण नाशिक येथील सुला वाईन्स येथे उतरले होते. ते मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे आले. दर्शनादी सोपस्कार आटोपून ते परवा सायंकाळी दुगारवाडी धबधबा येथे गेले. यातील कोटी रेड्डी हा यापुर्वी दुगारवाडी येथे येऊन गेला होता. तो आपल्या मित्रांना घेऊन आला होता.
मात्र यातील उप्पाला कोटी रेड्डी, अनुषा गोरांतला व रम्मिाला पुडी रघुवंशी हे धबधब्याचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबले तर अन्य तिघा जणांनी त्यांना थांबण्यास विरोध केला, पण या तिघांनी त्यांचे ऐकले नाही. शेवटी ते आपल्या बाईकवरु न परत सुला वाईन येथे आले. तर थाबलेले तिघेजण पाण्यात उतरले.
असेही समजते की अनुषाला सेल्फी काढण्याची सवय असल्याने कदाचित सेल्फीच्या नादात पाण्यात असलेल्या खडकावर ती उभी राहुन सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात खाली पाण्यात कोसळली. त्यात तिला काढण्यासाठी अथवा मदत करण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले मात्र तेही बुडाले, असा तर्क पोलीस करीत आहेत.
त्यातील पाण्यावर तरंगत असलेली अनुषा गोरांतला व उप्पाला कोटी रेड्डी यांना मुधवारी वैनतेय संस्थेच्या पथकाने काढले तर गुरुवारी दुपारच्या सुमारास रम्मिाला पुडी रघुवंशी याचा मृतदेह रेस्क्यु पथकाने वर काढला. विशष म्हणजे हे स्थळ अत्यंत अवघड दुर्गम ठिकाणी आहे. पाण्यातील खडकात अडकलेला मृतदेह शोधुन वर काढणे व दरीतुन वरती सपाटीवर मृतदेह घेऊन येणे मोठे जिकीरीचे काम होते, पण वैनतेय व रेस्क्यु पथकाला मात्र यश मिळाले.
दरम्यान घटनास्थळी त्र्यंबकेश्वर पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले तर अक्षरश: तळ ठोकून होते. सपोनि रामचंद्र कर्पे तहसिलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसिलदार रामकिसन राठोड, तलाठी परदेशी आदी उपस्थित होते.