नागडे शिवारात मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 00:31 IST2020-11-01T00:31:18+5:302020-11-01T00:31:45+5:30
येवला : तालुक्यातील नागडे शिवारात विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.

नागडे शिवारात मृतदेह आढळला
ठळक मुद्देअज्ञात म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद केली
येवला : तालुक्यातील नागडे शिवारात विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.
नागडे शिवारात उड्डाण पुला जवळ एका विहिरीत शुक्रवारी, (दि. 30) सकाळी दहा वाजता पुरुषाचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अज्ञात म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली. मात्र नंतर मृतदेहाची ओळख पटली. सदर मृतदेह येवला शहरातील दत्तू पुंजाराम पोळ (३२, रा. लक्ष्मीआई मंदिरा जवळ, येवला) यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.