मोहदरी घाटातील मृतदेहाची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:15 PM2020-07-26T16:15:58+5:302020-07-26T16:16:34+5:30
सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ असणाऱ्या वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी (दि.१९) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक बारकू ...
सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ असणाऱ्या वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी (दि.१९) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक बारकू महाजन (३८) रा. आयटीआय कॉलनी, साईविहार अपार्टमेंट, वृंदावन ग्रुप रो-हाऊस नं. २, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. १९ जुलै रोजी मोहदरी घाटाजवळील वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करु न तपासाला सुरु वात करण्यात आली होती. अधिक चौकशीत सदरचा मृतदेह अशोक बारकू महाजन यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अशोक महाजन यास अज्ञात इसमाने हत्याराने डोक्यात मारु न त्याचा खून केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीवरु न अज्ञात इसमाविरोधात भा. दं. वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.