शालिमारला महिलेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:35 AM2018-01-29T00:35:07+5:302018-01-29T00:35:26+5:30
शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागे अज्ञात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या महिलेची ओळख पटलेली नसून शवविच्छेदन अहवालातही अकस्मात मृत्यूचे कारण वैद्यकीय सूत्रांनी दिले आहे़ दरम्यान, या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे़
नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागे अज्ञात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) घडली़ या महिलेची ओळख पटलेली नसून शवविच्छेदन अहवालातही अकस्मात मृत्यूचे कारण वैद्यकीय सूत्रांनी दिले आहे़ दरम्यान, या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास शालिमार परिसरात दुर्गंधी पसरली होती़ याबाबत नागरिकांनी तपासणी केल्यानंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व श्रमिक सेना कार्यालयाच्या भिंतीजवळ एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला़ नागरिकांनी ही घटना भद्रकाली पोलिसांना सांगताच पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव हे कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन-तीन दिवसांपूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह कु जण्यास सुरुवात झाली होती़
मयत महिला ही अंदाजे ३० ते ४० वयोगटांतील असून, तिने अंगात पंजाबी ड्रेस घातलेला आहे़ या महिलेची ओळख पटलेली नसून प्रथम तिच्यावर अत्याचार व नंतर खून करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता़ जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या अंगावर मारहाणीच्या वा संशयास्पद खुणा आढळल्या नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी दिली़ दरम्यान, महिलेच्या मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़