हरणबारी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:19 PM2020-07-04T22:19:07+5:302020-07-04T23:27:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : हरणबारी धरणात बुडालेल्या हतनूर येथील सोळावर्षीय शाळकरी युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी (दि. ४) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र मोहिमेला अपयश आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : हरणबारी धरणात बुडालेल्या हतनूर येथील सोळावर्षीय शाळकरी युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी (दि. ४) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र मोहिमेला अपयश आले होते.
हतनूर येथील अर्जुन विष्णू देशमुख हा शाळकरी युवक शुक्र वारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वत:ची गुरे हरणबारी धरणाजवळ पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता. तिघे मित्र सोबत असल्याने त्यांना दुपारी पोहण्याचा मोह आवरला नाही. पोहत असताना अचानक अर्जुनचे पाय गाळात रु तले. तो वरती आलाच नाही. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी त्याच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर त्याचा शोधाशोध सुरू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसील जितेंद्र इंगळे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊ पोलीस यंत्रणेला पाचारण करून काही पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना बोलविण्यात आले. मात्र, रात्री धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणाच्या काठावर अर्जुनचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.