‘बोफोर्स’चा बॉम्ब हल्ला आर्टिलरीचा प्रात्यक्षिक सोहळा मैदानावर युद्धजन्य परिस्थितीचा थरार नव्या लढाऊ हेलिकॉप्टरने वेधले लक्ष वीस सेकंदात ‘हर्बरा’ उद्ध्वस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:56 AM2018-01-17T00:56:50+5:302018-01-17T00:57:50+5:30
नाशिक : एकापाठोपाठ एक युद्धभूमीवर शक्तिशाली लष्करी वाहनांद्वारे दाखल झालेल्या अत्याधुनिक सहा बोफोर्स तोफा...बॉम्ब हल्ल्यासाठी जवानांकडून बोफोर्स सज्ज
नाशिक : एकापाठोपाठ एक युद्धभूमीवर शक्तिशाली लष्करी वाहनांद्वारे दाखल झालेल्या अत्याधुनिक सहा बोफोर्स तोफा...बॉम्ब हल्ल्यासाठी जवानांकडून बोफोर्स सज्ज...तीस किलोमीटरवरील डोंगरावर निश्चित केलेल्या तेरा लक्ष्यांपैकी एक ‘हर्बरा’ हे अवघ्या वीस सेकं दात तोफा अचूकरीत्या भेदतात अन् उपस्थितांकडून टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. भारतीय सैन्याचा पाठीचा कणा समजल्या जाणाºया तोफखाना दलाचे शक्तिप्रदर्शन बघून प्रत्येकाने या दलाविषयी अभिमान बाळगला. निमित्त होते, स्कूल आॅफ आर्टिलरीच्या वतीने आयोजित वार्षिक अभ्यास सराव प्रशिक्षण प्रात्यक्षिकाचे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय तोफ खाना भविष्यात कुठल्याहीप्रसंगी उद्भवलेल्या युद्धाप्रसंगी सैन्याचा पाठीचा कणा बनून स्वत:ला सिद्ध करत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश मंगळवारी (दि.१६) या प्रात्यक्षिक सोहळ्यातून देण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरावणे, कमान्डंंट स्कूल आॅफ आर्र्टिलरी लेफ्टनंट जनरल रणवीरसिंग सलारिया, उपकमान्डंट तथा आर्टिलरीचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल एस. आर. पाणीग्राही, लेफ्टनंट कर्नल पी. के. शर्मा, मेजर जनरल पवनकुमार सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. ३६० अंशांत गोलाकार फिरून बॉम्ब हल्ला करणारी ‘बोफोर्स’, वीस सेकंदात चाळीस अग्निबाण दागण्याची क्षमता ठेवणाºया रॉकेट लॉन्चरने केलेला रॉकेट हल्ला, तर उखळी मारा करणाºया सॉल्टम, मॉर्टर, हॉवित्झर-७७, १३०-एम.एम. रशियन तोफांसह एकूण सात अत्याधुनिक तोफांचा कानठळ्या बसविणारा व परिसर हादरून सोडणाºया बॉम्ब हल्ल्याने देवळाली कॅम्प येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या (स्कूल आॅफ आर्टिलरी) गोळीबार मैदानाने युद्धभूमीचा थरार अनुभवला. देवळाली कॅम्पच्या मैदानावर प्रात्यक्षिक सोहळ्यादरम्यान कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ‘कॅट््स’ची लढाऊ हेलिकॉप्टर ध्रुव, चित्ता, चेतकच्या हवाई कसरतींनी लक्ष वेधले. या हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीवर सैनिक ांना रसद पुरविणे, अतिरिक्त सैन्याला पाचारण करणे, जखमींना युद्धभूमीवरून हलविण्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. ‘धु्रव’मधून आठ हजार फुटांवरून युद्धभूमीवर पॅराशुटद्वारे दाखल झालेल्या सैनिकांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.