बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:58 PM2018-09-07T23:58:17+5:302018-09-08T00:53:31+5:30

महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने बोगस जन्मदाखला दिल्याचे आढळले असून, जो कर्मचारी चार वर्षांपूर्वी निवृत्त होण्याची गरज होती तो आजही महापालिकेच्या सेवेत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शोध मोहिमेत आढळले आहे. संबंधित कर्मचाºयाने बोगस प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकार घडला असून, या कर्मचाºयास नोटीस बजावण्यात आली आहे.

Bogus birth certificate; Municipal Lipikas Notice | बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस

बोगस जन्मदाखला; मनपा लिपिकास नोटीस

Next
ठळक मुद्देकारवाई : तो चार वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता निवृत्त

नाशिक : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने बोगस जन्मदाखला दिल्याचे आढळले असून, जो कर्मचारी चार वर्षांपूर्वी निवृत्त होण्याची गरज होती तो आजही महापालिकेच्या सेवेत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शोध मोहिमेत आढळले आहे. संबंधित कर्मचाºयाने बोगस प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकार घडला असून, या कर्मचाºयास नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया कर्मचाºयांबद्दल प्रशासनाकडे तक्रारी येत असतात. त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. तक्रारकर्त्याने निनावी तक्रार केली असेल तर अर्ज निरस्त केला जातो. तथापि, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात नियुक्त असलेल्या महेश शंकर जाधव या लिपिकाच्या बोगस जन्म- दाखल्याविषयी तक्रार आली तेव्हा महापालिकेने त्याची छाननी करण्याचे ठरविले. या कर्मचाºयाने जन्मतारीख ५ सप्टेंबर १९६० दाखविली असून, ही तारीख चुकीची असल्याची अर्जदाराची तक्रार होती. महिनाभरापूर्वी आलेल्या यापत्राची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांना चौकशी करण्यास
सांगितले.
सदर कर्मचाºयाने महा- पालिकेच्याच शाळेचा संदर्भ दिला असल्याने शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला. त्या आधारे उपासनी यांनी तपासणी केली असता महापालिकेच्या भालेकर हायस्कूलमध्ये त्याच्या जन्मतारखेची नोंद ५ सप्टेंबर १९५६ अशी आढळली. म्हणजे नियत वयोमानाने हा कर्मचारी चार वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त होणे अपेक्षित असताना तो आजही कामावरच आहे.
निनावी तक्रारीची दखल
उपासनी यांनी त्यासंदर्भात अहवाल दिल्यानंतर बच्छाव यांनी त्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निनावी तक्रारींची दखल घेतल्यानंतर अनेक कर्मचारी त्यास विरोध करतात; परंतु आता निनावी तक्रारीची दखल प्रशासनाने घेतल्यानेच हा प्रकार उघड झाला आहे.

Web Title: Bogus birth certificate; Municipal Lipikas Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.