भाजपामुळेच मतदार याद्यांमध्ये बोगस नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:43+5:302021-09-22T04:16:43+5:30
शिवसेना महिला आघाडीच्या सिडकोतील प्रभाग २८ आणि २९ मधील आठ नवीन शाखांचे उद्घाटन शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते ...
शिवसेना महिला आघाडीच्या सिडकोतील प्रभाग २८ आणि २९ मधील आठ नवीन शाखांचे उद्घाटन शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षपदावरून बडगुजर बोलत होते. नाशिक जिल्ह्यात मतदार शुद्धीकरण मोहीम सुरू झाली हे शिवसेनेच्या लढ्याचे खरे यश आहे. खोट्या मार्गाने कुणी सत्तेवर येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेतच. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने महिला आघाडीची जबाबदारीही वाढली असून महिला सबलीकरण,बचत गट आणि स्वयंरोजगाराचे विविध कार्यक्रम हाती घेऊन महिलांमध्ये जनजागृती करावी व शिवसेनेत जास्तीत जास्त महिला कशा येतील यादृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहनही बडगुजर यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर,मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, रंजना नेवाळकर, संगीता खोडाना उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक २९ मधील स्टेट बँक, राणेनगर जवळ चौपाटी, विजय नगर स्टॉप सिडको, महाकाली चौक, उत्तम नगर तर प्रभाग क्रमांक २८ मध्ये कामवाडे, कंपाऊंड झोन, फडोळ मळा, शनी मंदिर, अंबड रोड येथे नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत.
उद्घाटनप्रसंगी युवासेना जिल्हा संघटक दीपक दातीर, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख प्रवीण तिदमे, माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी, मामा ठाकरे, सभापती सुवर्णा मटाले,महिला आघाडी जिल्हा संघटक मंदा दातीर,मंगला भास्कर,समन्वयक ॲड. शामला दीक्षित, प्रेमला जुन्नरे, शोभा मगर, शोभा गटकळ, लक्ष्मी ताठे, नगरसेविका रत्नमाला राणे, डी.जी.सूर्यवंशी, हर्षा बडगुजर,चंद्रकांत खाडे,भागवत आरोटे,शामकुमार साबळे,कल्पना चुंबळे,किरण गामणे, हर्षदा गायकर,सुदाम ढोमसे, नाना पाटील,विष्णू पवार,सुभाष गायधनी,रमेश उघडे,गणेश बर्वे,बालम शिरसाठ,सुयश पाटील,नीलेश साळुंखे,पवन मटाले,मयूर परदेशी,अलका गायकवाड,शोभा दोंदे,व्दारका गोसावी, मंदाकिनी जाधव,कीर्ती जावखेडकर,अनिता पाटील, विठाबाई पगारे,शीतल भामरे,सुमन सोनवणे,तृप्ती नाईक,अरुणा धामणे, संजय भामरे,राहुल सोनवणे,मोन्टी दळवी आदी उपस्थित होते.