पेठला जलयुक्तची बोेगस कामे
By admin | Published: June 2, 2017 01:07 AM2017-06-02T01:07:35+5:302017-06-02T01:07:46+5:30
नाशिक : पेठ तालुक्यात कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे तसेच मागील दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला
नाशिक : पेठ तालुक्यात कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे तसेच मागील दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी पेठच्या सभापती पुष्पा गवळी यांनी कृषी समितीच्या बैठकीत केली. त्यावर जलयुक्त शिवार योजनेच्या संबंधित कामांची चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
पेठच्या सभापती पुष्पा गवळी यांच्याकडे शशिकांत भुसारे, हरी गवळी, दिनकर गवळी, योगेश सापटे, एकनाथ पवार यांनी निवेदन देत कृषी विभागातील कामांची तसेच सन २०१५-१६, व सन २०१६-१७ या वर्षात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. तसेच झालेली कामे अत्यंत निकृष्टप्रतीची असल्याचे म्हटले आहे. नाला बल्डिंगची कामे निकृष्ट झाली असून, त्यात पाणी साचत नसल्याने पेठ तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली नाही. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती.
तोच धागा पकडून पेठच्या पंचायत समिती सभापती पुष्पा गवळी यांनी कृषी विभागाच्या मासिक बैठकीत उपाध्यक्ष नयना गाविीा यांच्याकडे जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशीची मागणी केली. त्यानुसार बैठकीत या कामांच्या चौकशीचा ठराव संमत करण्यात आला.