राजापूर येथे बीएसएनएल सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:54 PM2020-07-05T16:54:54+5:302020-07-05T16:56:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भ्रमणध्वनी सेवा ही वारंवार विस्कळीत होते तर कधी कधी आठ ते दहा दिवस बंद राहते. राजापूर येथे बीएसएनएल चे कृषी योजनेचे मोठ्या संख्येने ग्राहक असून या ग्राहकांना दर मिहन्याला 141 चा रिचार्ज हा करावाच लागतो परंतु भ्रमणध्वनी सेवा व इंटरनेट सेवा कायमच खंडीत राहते.
अनेक ग्राहकांनी वैतागून खाजगी कंपनीकडे आपले भ्रमणध्वनी क्र मांक पोर्ट केले आहे. बीएसएनएल सेवा वारंवार खंडीत व बंद राहत असल्याने त्याचा फटका राजापूर येथील गॅस एजन्सी व बँकेलाही बसतो. सध्या शेतकर्?यांचे पीक विमा भरण्याचे कामे सुरू असून मोबाईल सेवा बंद असल्याने आॅनलाइन प्रक्रि या वारंवार बंद पडत आहे.
संबंधित अधिकार्?यांकडे तक्र ार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. इतर कंपन्यांची सेवा सुरळीत चालते मग बीएसएनएल सेवा का बंद पडते असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकार्?यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.