वटार परिसरात बेमोसमी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 05:56 PM2018-11-05T17:56:08+5:302018-11-05T18:11:18+5:30
बागलाण : बळीराजा पुन्हा संकटात; कांदा रोप खराब होण्याची भीती वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात अचानक दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाºर्यासह आलेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास जाणार असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा, आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा त्रास तर चालूच होता, पण आता पाणी पडल्याने बळीराज्यापुढे मोठ संकट उभ राहील आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षाच्या रबी हंगामाची सुरुवातच खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी बळीराजा शेतीच्या मशागतीत महगुल दिसत होता, तर काही शेतकरी मक्याच्या कापणीच्या कामात व्यस्त होते. अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले. लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले चार महिने आभाळाकडे डोळे लागले होते. केव्हा पाऊस पडेल अशी आस होती, पण कोणाच्या मनात शंकाही नसतांना पावसाने राडीचा डाव खेळल्याने बळीराजा दुखावला आहे.
परिरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून भाजीपाला पिकाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बेसावध असलेल्या बळीराज्याने जमा करुन ठेवलेल्या मकाच्या कणसांमध्ये पाणी घुसल्याने मक्याचे नुकसान झाले आहे.