दिंडोरी-उमराळे रोडवर मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:56 AM2018-03-14T00:56:56+5:302018-03-14T00:56:56+5:30
नाशिक : दिंडोरी-उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणाºया बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़
दिंडोरी-उमराळे रोडवर बोलेरो वाहनातून जप्त केलेला मद्यसाठा व संशयितांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी़
नाशिक : दिंडोरी-उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणाºया बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्णातील अवैध मद्याची वाहतूक, विक्री तसेच हातभट्टीची दारू तयार करणाºयांवर छापेमारी सुरू आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि़१२) मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते़ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना पेठ-दिंडोरी रस्त्याने देशी-विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोलीस हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलिक राऊत, गणेश वराडे, अमोल घुगे, विश्वनाथ काकड यांच्या पथकाने दिंडोरी हद्दीतील उमराळे-दिंडोरी रोडवर सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हिरव्या रंगाची बोलेरो कार (एमएच०४, डीएन १३२५) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये २ लाख ३१ हजार ८८८ रुपयांचा देशी-विदेशी मद्याचा अवैध मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी बोलेरो व मद्यसाठा असा ५ लाख ३१ हजार ८८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक खांडवी व त्याचा साथीदार नागरे या दोघांना अटक केली़ या दोघांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़