बोंडारमाळला ७० वर्षानंतर अवतरली जलगंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:50 PM2019-05-09T18:50:50+5:302019-05-09T18:51:22+5:30

पेठ - महाराष्ट्राची सर्वात मोठी आणी सद्या नदीजोड प्रकल्पात चर्चेत असलेल्या दमणगंगा नदीच्या पात्रापासून दीड कि मी उंचावर वसलेल्या पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या अतिदुर्गम गावाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जलगंगा अवतरली आहे.

Bondarmal 70 years after the Jalgaon! | बोंडारमाळला ७० वर्षानंतर अवतरली जलगंगा !

बोंडारमाळला ७० वर्षानंतर अवतरली जलगंगा !

Next

आपुलकी सेवाभावी ग्रूपच्या सहकार्याने व उद्योजक दौलतराव कुशारे यांच्या सामाजिक दातृत्वातून बोंडारमाळ हे गाव कायमस्वरूपी जलयुक्त झाले आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळात जवळपास दीड कि.मी. अंतरावरून पाणी आणणाऱ्या बायाबापड्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे. बोंडारमाळच्या ग्रामस्थांनी श्रमदान केले. दमणगंगा नदीच्या पात्रात विहीर खोदून दीड कि.मी. पाईपलाईनच्या साहाय्याने गावात पाणी आणले.
अखिल भारतीय पंचदशनाम जूना आखाडयाचे अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते जय जनार्दन जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, दौलत कुशारे, नंदा कुशारे, निलांबरी पाटील, नुपूर पाटील, निलेश कुशारे, गौरी कुशारे, तेजिस्वनी कुशारे, आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रूपचे अध्यक्ष खंडेराव डावरे, राकेश दळवी, विष्णू हगवणे, चंद्रशेखर पठाडे, शांताराम गायकवाड,.सतिश चितोडकर, जयवंत राऊत, संदिप बत्तासे, कविता डावरे, अरूण सुबर, सरपंच मिना पवार, दिनेश पवार,मुझफर शेख, अरूण बेलदार, कमोद गाडर, कैलास गाडर, हिरामण वातास, हिरामण गाडर, गुलाब पेटार, रामचंद्र वातास, सोमा वातास, काळू वातास यांचेसह उम्रद व बोंडारमाळ परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Bondarmal 70 years after the Jalgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.