बहिण-भावाच्या नात्यातील बंध होणार घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:31 PM2018-08-25T17:31:29+5:302018-08-25T17:31:51+5:30

वडनेर : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक व नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा राखीपौर्णिमा सण उद्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी माहेरचे डोहाळे लागलेल्या बहिणी माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

 The bonds in the siblings' relationship will be tight | बहिण-भावाच्या नात्यातील बंध होणार घट्ट

बहिण-भावाच्या नात्यातील बंध होणार घट्ट

Next
ठळक मुद्दे रक्षाबंधन : शाळा-महाविद्यालयातही रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रम

समाधान शेवाळे ।
वडनेर : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक व नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा राखीपौर्णिमा सण उद्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी माहेरचे डोहाळे लागलेल्या बहिणी माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या उक्तीप्रमाणे भावासाठी बहिणीच्या आनंदाला उधाण येणार आहे. शाळा, महाविद्यालयातही रक्षाबंधन साजरे केले जात आहेत. शाळा व महाविद्यालयात आपल्या मानलेल्या भावाला बहिणी राखी बांधतील. नव्याने तयार नात्यातील राखीच्या धाग्याने नात्यातील बंध अधिक घट्ट होणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात नवनवीन राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आपल्या लाडक्या भावाला नाविन्यपूर्ण राखी घेऊन बांधण्याकडे बहिणीचा कल वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राख्यांची निवड केली जात आहे. भाऊ बहिणीचे नाते अनोखेच असून राखी पौर्णिमा प्रेम व कर्तव्य याची जाणीव करुन देणारा सण आहे. आपल्या भावाची ओवाळणी करून उजव्या हातावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणुन प्रार्थना करतात. तर भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारेल.
राखीचा धागा बंधुरायाच्या हातात बांधून बहिण जन्मभराचे रक्षण करण्यासाठी भाऊरायाला जणू बंधनात बांधते आणी यासाठी भाऊ बहिणीचे रक्ताचे नाते हवे असेही नाही. कोणत्याही जाती-धर्माची या बंधनासाठी अट नसते. असतो तो केवळ बंधुभाव हीच भावना रुजत चालल्याने शाळा महाविद्यालयातही राखीपौर्णिमा सणाला महत्व प्राप्त झाले असून राखीच्या धाग्याने बहीण भावाच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होणार आहे.रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीला आल्या आहेत. सायंकाळी राख्या खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title:  The bonds in the siblings' relationship will be tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक