‘सावाना’चा पुस्तक देवघेव विभाग लिमये सभागृहात स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:07+5:302021-07-15T04:12:07+5:30

सावानाच्या नूतन पुस्तक देवघेव विभागाचे उद्घाटन मंगळवारी (दि. १३ ) मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व डॉ. विनायक गोविलकर यांच्याहस्ते ...

The book 'Savannah' was moved to the Limaye Hall in Devghev Division | ‘सावाना’चा पुस्तक देवघेव विभाग लिमये सभागृहात स्थलांतरित

‘सावाना’चा पुस्तक देवघेव विभाग लिमये सभागृहात स्थलांतरित

Next

सावानाच्या नूतन पुस्तक देवघेव विभागाचे उद्घाटन मंगळवारी (दि. १३ ) मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व डॉ. विनायक गोविलकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. आर्चिस नेर्लीकर व सावानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नीलिमा पवार यांनी किंडल स्टोरी टेल या पुस्तके वाचनाच्या नवीन डिजिटल पद्धतीचे महत्त्व सांगतानाच सावानाने आता डिजिटल पुस्तके सभासदांना टॅबच्या रूपाने डिपॉझिट घेऊन उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी केले. सांस्कृतिक सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजिद बगदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, सावानाच्या सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, अर्थसचिव उदयकुमार मुंगी, वस्तुसंग्रहालय सचिव बी.जी. वाघ, गंगापूर रोड शाखा प्रमुख - बालभवन प्रमुख गिरीश नातू, ॲड. भानुदास शौचे, श्रीकांत बेणी, गणेश बर्वे, अमोल बर्वे, मंगेश मालपाठक आदी उपस्थित होते.

Web Title: The book 'Savannah' was moved to the Limaye Hall in Devghev Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.