शाळांना २ मे रोजी मिळणार पुस्तिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:10 AM2018-05-01T01:10:29+5:302018-05-01T01:10:29+5:30
शिक्षण विभागाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप शाळांना दि.२ पासून करण्यात येणार आहे.
नाशिक : शिक्षण विभागाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप शाळांना दि.२ पासून करण्यात येणार आहे. शहरातील सर्व शाळांना प्रवेशप्रक्रि येच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १० मे पासून माहिती पुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे. या माहिती पुस्तिकांतून अकरावी आॅनलाइन प्रवेशाची नियमावली, प्रवेश फे ऱ्या, मार्गदर्शन केंद्र अशी सर्व माहिती उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना या माहितीचा उपयोगी पडणार आहे. शिक्षण विभागातर्फे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येणार आहे. शहरातील ५७ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रि या पूर्ण केली असून, त्यात २७ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत. शहरात यावर्षी तीन नवीन कॉलेज सुरू झाले असून, त्यात उन्नती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, गुरू गोविंद सिंग ज्युनियर कॉलेज, इंडियन पब्लिक स्कूल या महाविद्यालयांचा सहभाग आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध शाळांना २ मे पासून माहिती पुस्तिकांचे वाटप होेणार असून, शाळांनी त्यांच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांना १० मे पासून माहिती पुस्तिकांचे वाटप करावयाचे आहे. नवीन महाविद्यालयांमधील व वाढीव तुकड्यांच्या माध्यमातून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा वाढणार आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकड्या घेतल्या असल्याने विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना वाढीव जागा उपलब्ध होणार आहे.