जिव्हाळेतील बालकांना पुस्तकांचा जिव्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 02:39 PM2020-08-27T14:39:03+5:302020-08-27T14:39:22+5:30

कसबे सुकेणे : सद्या निफाड तालुक्यातील एका गावात शाळा बंद आहे, पण शिक्षण मात्र सुरु आहे. बालकांच्या हाती येथे पुस्तके आहेत. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून कोरोना विषयक खबरदारी घेत या गावाने शाळेत ग्रंथालय सुरु केले आहे.

Books for children | जिव्हाळेतील बालकांना पुस्तकांचा जिव्हाळा

जिव्हाळेतील बालकांना पुस्तकांचा जिव्हाळा

Next
ठळक मुद्दे शाळा बंद पण शिक्षण सुरू ; गावाचा स्तुत्य उपक्र म

कसबे सुकेणे : सद्या निफाड तालुक्यातील एका गावात शाळा बंद आहे, पण शिक्षण मात्र सुरु आहे. बालकांच्या हाती येथे पुस्तके आहेत. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून कोरोना विषयक खबरदारी घेत या गावाने शाळेत ग्रंथालय सुरु केले आहे.
येथून जवळच असलेल्या जिव्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘गाव तेथे ग्रंथालय’ या योजनेतुन ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे मुलांचा मोबाईलवर गेम खेळणे व टिव्ही पाहणे याकडे अधिक कल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व अभ्यासाची सवय राहावी या उद्देशाने जिव्हाळे गावात ग्रंथालय सुरू करण्यात आले असुन मुलांना लहान लहान गोष्टींची, थोर विचारवंताची, बाल कथा, पंचतंत्रातील गोष्टी, इसाप निती, देवी-देवता, संत, ऋ षी-मुनी,शास्त्रज्ञांची व सण-वार आदी माहितीची शंभर पुस्तके लोकसहभाग व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून संकलित करण्यात आली आहे. या उपक्र मासाठी संपुर्ण जिव्हाळे गावातील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचेही सुयोग गायकवाड व मुख्याध्यापक विजय पाटील यांनी सांगितले. ग्रंथालयाच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच निर्मला पागेरे, उपसरपंच सुयोग गायकवाड, रावसाहेब पागेरे, कैलास वणवे, मीना पवार, सुरेश जाधव, सतीष लोखंडे ग्रामसेवक ज्योती जेठवा, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मुख्याध्यापक विजय पाटील व उपशिक्षक एस. एन. कोठावदे उपस्थितीत होते.

आमच्या हा ग्रथांलय उपक्र म सोशल डिस्टंसींग ठेवत कोरोनाची खबरदारी घेत सुरू केला आहे. यात शाळेच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
- सुयोग गायकवाड, उपसरपंच, जिव्हाळे. (२७ कसबा सुकेणे)

Web Title: Books for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.