पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पाठयपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:37 PM2019-06-15T19:37:00+5:302019-06-15T19:43:12+5:30

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.

Books will be available to children on the first day | पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पाठयपुस्तके

मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तारकंपाउंड आणि रंगरंगोटी करून झालेला बदल.

Next
ठळक मुद्देमानोरी : शाळेतील डिजीटल बदलाने पटसंख्या वाढण्याची शिक्षकांना अपेक्षा

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.
यात प्रामुख्याने मागील पंधरा दिवसापासून इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या शाळा प्रवेश बाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यंदा मात्र दुष्काळ परिस्थितीमुळे सर्व सामान्य शेतकरी आपल्या पाल्याला इंग्रजी की मराठी पैकी कोणत्या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा? अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.
परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळे प्रमाणे मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळेने देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा डिजीटल शाळा झाल्या आहेत. संगणकीय प्रणालीवर इयत्ता पहिली पासून शिक्षण देण्यास सुरुवात देखील झाली आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आनंदमय जाण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रि या ही शून्य खर्चावर दिली जाणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पलिी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नि:शुल्क दरात मोफत प्रवेश, मोफत पाठयपुस्तके, मोफत २ गणवेश दिले जाणार आहेत.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आली असून मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामिगरी झाल्याने गावातील पालकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेविषयी आपुलकी वाढत चालली आहे. गतवर्षी पासून अनेक विविध प्रकारच्या उपक्र मातून नाविन्यपूर्ण शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्र मामुळे पटसंख्या वाढत चालली आहे.
ग्रामपंचायतच्या १४ वित्त आयोगातून प्राथमिक शाळेसाठी डिजीटल वर्ग आणि रंगरंगोटी कामासाठी निधीची तरतूद केल्याने दोन वर्षात शाळेचा कायापालट झाला असून शाळेच्या कोऱ्या भिंती रंगरंगोटीने जणू बोलक्या झाल्या आहेत. तसेच दोन संगणक संचच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
शाळेची इमारत ही गावातील मुख्य रस्त्या लगत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. चालू वर्षी तार कंपाउंड काम देखील जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणून एकाच वर्षात शाळेची पटसंख्या दुपटीवर येऊन पोहोचली आहे.
 

Web Title: Books will be available to children on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.