कांदा भावात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:21 PM2018-10-11T15:21:21+5:302018-10-11T15:21:37+5:30
लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भाव १३९४ रूपयांनी विक्र ी झाला.
लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भाव १३९४ रूपयांनी विक्र ी झाला. कांदा व्यापाराची प्रथम क्र मांक असलेल्या लासलगाव बाजारपेठेत होणारी कमी आवक, चांगले दर्जाचे उन्हाळा कांदा कमी येत आहे.त्याचबरोबर कोलंबोत झालेल्या पावसाने बाजारपेठेत कांदा खराब झाला आहे.त्यामुळे कोलंबोची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात खान्देश भागात लवकर येणारा नवीन लाल कांदा पावसाअभावी सध्या येत नाही तसेच तयार होत असलेला नवीन लाल कांदा हा पोषक नाही त्याला नेहमीसारखे वजन नाही .यामुळे दसरा सणापर्यत होणारी आवाक कमी आहे, असे कांदा निर्यातदार नितीन जैन सागितले. पावसामुळे लाल कांद्याची न झालेली वाढ याचा ताण आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा मागणीचा दाब सध्या सुमार दर्जाचे उन्हाळा कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.येत्या आठ दिवसात कांदा बाजारपेठेत नवीन कांदा चांगले प्रमाणावर आला तर तेजी पुर्वपदावर येईल असे काही मान्यवरांचे मत आहे. लासलगाव कांदा बाजारपेठेत गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ६४,३४४ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ३५१ कमाल रु पये १,०७८ तर सर्वसाधारण रु पये ८९३ प्रति क्विंटल राहिले होते.