मका पासून फीड तयार करण्याच्या उद्योगाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:23+5:302021-09-22T04:16:23+5:30

मालेगाव तालुक्यात कापूस २ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे तर डाळिंबाचे क्षेत्र १४ हजार ...

Boost the feed making industry from maize | मका पासून फीड तयार करण्याच्या उद्योगाला चालना

मका पासून फीड तयार करण्याच्या उद्योगाला चालना

googlenewsNext

मालेगाव तालुक्यात कापूस २ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे तर डाळिंबाचे क्षेत्र १४ हजार हेक्टर इतके आहे. ज्वारी ८२४ हेक्टर, बाजरी १८ हजार ९६३ हेक्टर, मका, ४४ हजार ७३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकरी ८० टक्के विहिरींचे पाणी डाळिंब पिकासाठी वापरतात. १५ टक्के शेतकऱ्यांना कालव्याचा उपयोग होतो तर १ ते २ टक्के शेतकरी पिकांसाठी बोअरवेलचा उपयोग करतात. तालुक्यात आठ गावांमध्ये रूरबन योजना राबविण्यात येत असून त्यात दाभाडी, रावळगाव, पिंपळगाव, ढवळेश्वर, जळगाव, बेळगाव तळवाडे, पांढरूण या गावांचा समावेश आहे.

आज बाजारभाव बघितले तर बाजरीला १५५३ रुपये प्रति क्विंटल, हरभरा पिकास ३ हजार ९२३ रुपये क्विंटल, मका पिकास १ हजार ३२९ रुपये क्विंटल, ज्वारीला ४ हजार ७० रुपये क्विंटल, सोयाबीनला ६ हजार ३७२ रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत आहे.

पणन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला असून पौष्टिक तृणधान्ये एकात्मिक बरड धान्य यास उपयाेग होतो. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नॅशनल हार्टिकल्चर बोर्डाच्या योजनेचा देखील लाभ घेतला आहे.

---------------------------

शेतकऱ्यांना विम्याचे कवच

मालेगाव तालुक्यातील ५ हजार ८३७ शेतकऱ्यांनी ४ ००८.३० क्षेत्रावर कापसाची लागवड केली असून त्याचा विमा उतरविण्यात आला आहे. तालुक्यातील २४ हजार ८७८ शेतकऱ्यांनी मका पिकाचा विमा उतरविला आहे. १८ हजार ६५२.७४ क्षेत्रावरील मका पिकाचा शेतकऱ्यांनी विमा उतरवून पीक संरक्षित केले आहे. ४ हजार ५३० शेतकऱ्यांनी कांदा पिकाचा विमा उतरविला आहे. १ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र कांदा पिकाचा विमा काढण्यात आला आहे. १ हजार ९२ शेतकऱ्यांनी ५५६.२३ हेक्टर क्षेत्रातील आपल्या बाजरी पिकाचा विमा उतरविला आहे.

----------------------------

तालुक्यात कांदा पिकावर प्रक्रिया उद्योग वाढीस संधी आहे. मात्र लाल कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो प्रक्रियेसाठी पांढरा कांदा आवश्यक असतो याकरिता लाल कांद्यावर प्रकिया करण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

- गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी, मालेगाव

Web Title: Boost the feed making industry from maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.