कोरोना फायटर्सना ‘अर्सेनिक अल्बम ३०’चा बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:32 PM2020-05-25T21:32:21+5:302020-05-26T00:10:55+5:30

सिन्नर : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह आरोग्यसेवकांना तसेच पत्रकारांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपयोगी ठरणाºया होमिओपॅथिक ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधांचे डॉ. सुरेश बिडवई यांनी वाटप केले.

Booster dose of Arsenic Album 30 for Corona Fighters | कोरोना फायटर्सना ‘अर्सेनिक अल्बम ३०’चा बूस्टर डोस

कोरोना फायटर्सना ‘अर्सेनिक अल्बम ३०’चा बूस्टर डोस

Next

सिन्नर : कोरोनाशी दोन हात करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह आरोग्यसेवकांना तसेच पत्रकारांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपयोगी ठरणाºया होमिओपॅथिक ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधांचे डॉ. सुरेश बिडवई यांनी वाटप केले.
या औषधामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फार कमी असल्याने याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापर केला जात आहे. पाण्यासोबत ३० वेळा मिश्रण करून सौम्य केले असल्याने प्रत्यक्ष औषधामध्ये मूळ द्रव्याचा अंश शिल्लक नसल्यामुळे याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. शहरातील होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्सकडे हे औषध उपलब्ध आहे. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया डॉ. बिडवई यांनी कोरोनाशी लढणाºया आरोग्यसेवकांची प्रतिकारशक्ती वाढावी या उद्देशाने येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह सर्व आरोग्यसेवकांना या औषधाचे मोफत वाटप केले. यावेळी सिल्व्हर लोट्सचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बिन्नर, जयवंत गांगुर्डे आदी उपस्थित होते.
---------------------
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना म्हणून अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचा फायदा होत असल्याचे केंद्रातील आयुष मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. अर्सेनिक अल्बम ३० हे मूलद्रव्य असून, श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथीमध्ये गुणकारी मानले जाते.

Web Title: Booster dose of Arsenic Album 30 for Corona Fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक