शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणी डोंगराला आग; वनविभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:08 AM2017-11-10T00:08:35+5:302017-11-10T00:12:44+5:30
शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणीच्या डोंगराला मागील बाजूस गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गुराख्यांनी जाणूनबुजून आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
पाथर्डी फाटा : शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणीच्या डोंगराला मागील बाजूस गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गुराख्यांनी जाणूनबुजून आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पांडवलेणीच्या डोंगराला आग लावण्याच्या घटना घडत आहेत. गुरु वारी डोंगराला आग लावण्यात आल्याने वनविभाग व नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काल सायंकाळी डोंगराच्या मागील बाजूस ही आग लावण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी डोंगरावर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतार, उंच वाढलेले गवत, झाडी, मोठ्या प्रमाणात फेलावलेली आग यामुळे रात्रीपर्यंत आग विझविणे किंवा नियंत्रण मिळविणे अवघड झाले. या डोंगरावर असलेल्या जैवविविधतेला या आगीमुळे मोठे नुकसान होत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र चाºयाच्या अपेक्षेने पाळीव जनावरे गाय, म्हैस, बैल हे डोंगर उतारावर जाऊ नयेत म्हणून गुराख्यांनी ही आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. या आगीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने परिसरातील पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.