रस्त्यावरील गरिबांना मायेची ऊब़़

By admin | Published: December 28, 2015 10:18 PM2015-12-28T22:18:58+5:302015-12-28T22:20:27+5:30

उपक्रम : मानव उत्थान मंचतर्फे गरिबांना कपड्यांसह ब्लँकेट वाटप

The boredom of the poor on the streets | रस्त्यावरील गरिबांना मायेची ऊब़़

रस्त्यावरील गरिबांना मायेची ऊब़़

Next

नाशिक : नाताळमध्ये सांताक्लॉज गुपचूप येतो अन् भेटवस्तू देऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवितो़ नाताळच्या पूर्वसंध्येला शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना मानव उत्थान मंचमधील कार्यकर्त्यांच्या रूपाने आधुनिक सांताक्लॉजच भेटले़ या सांताक्लॉजनी जीव गारठून टाकणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये या गरिबांना उबदार कपडे आणि ब्लँकेट वाटप करून गुरुवारी मायेचे पांघरून घातले आहे़
शहरात अनेक दिवसांपासून मानव उत्थान मंचचे सहकारी शहरातून कपडे व ब्लँकेट जमा करण्याचे काम करीत होते़ शहरातील पाच सेंटरच्या माध्यमातून मंचच्या कार्यकर्त्यांनी हे जमा केलेले कपडे गुरुवारी शहरातील रस्त्यांवर राहणाऱ्या गरिबांना वाटप करण्यात आले़ रुग्णालयाबाहेर राहणारे, अमरधामपासून तर रामकुंडापर्यंत राहणारे, द्वारका उड्डाणपुलाच्या खाली राहणारे, पपया नर्सरीजवळील रस्त्यावर राहणाऱ्या गरीब नागरिकांना हे कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले़
मानव उत्थान मंचतर्फे सुमारे ६२० नागरिकांना कपडे, तर १५० महिला व वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले़ या उपक्रमात मानव उत्थान मंचचे जय शिवरामन, जसमित सेहमी, जकिया शेख, जगबीर सिंग, हरप्रित सिंग, नितीन शुक्ल,अश्पाक ताहेरी, आदित्य त्रिपाठी, आकाश शर्मा, पंकज जोशी, सचिन बुरकुले, अंगद सिंग, अनिल सिंग यांच्यासह आठवीपासून ते बारावीच्या मुलांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)

सामाजिक जाणिवेतून रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना आम्ही उबदार कपडे व ब्लँकेट वाटप केले़ विशेष म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणीही ख्रिश्चन धर्मिय नाही़ येत्या १ जानेवारीला पुन्हा हा कार्यक्रम केला जाणार असून, कपडे दान करण्यासाठी संपर्क साधावा़ - जगबीर सिंग, मानव उत्थान मंच

Web Title: The boredom of the poor on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.