स्मशानभुमित स्वखर्चाने बोअरवेल खोदून जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:36 PM2020-01-11T13:36:48+5:302020-01-11T13:40:54+5:30
भगुर येथील बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेच्या वतीने स्मशानभूमीत स्वखर्चाने बोरवेल खोदून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले
नाशिक : भगुर नगर पालिकेला विनंती करून निवेदने देऊन मृत्यु अंतयात्रेस आलेल्या नागरिकांसाठी पाण्याची सोय न केल्यामुळे भगुर येथील बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेच्या वतीने स्मशानभूमीत स्वखर्चाने बोरवेल खोदून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले.
भगुर शहरात डॉ.सी.जे.लकारीया परीवाराने १९९६ साली स्मशानभूमी बांधून भगुर नगरपालिकेला दिली होती मात्र याठिकाणी अंत्यसंस्कार झाल्यावर नागरिकांना हातपाय धुण्यासाठी खोलवर नदीत उतरावे लागत होते. तसेच अस्ती विर्सजन करण्यासाठी नदीच्या पात्रात जावे लागत असते. मात्र दिवसेदिवस नदिची खोली वाढत असल्याने नदीत उतरणे धोकादायक ठरत होते.यासाठी भगुर नगर पालिकेकडे येथे बोरवेल खोदून देण्याची मागणी बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेने अनेक वेळा केली मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संघटनेने स्वखर्चातून स्मशानभूमीत बोरवेल खोदून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संघटनेचे चद्रकांत वालझाडे, कैलास भोर, राकेश ताजनपुरे, शाम शिंदे, निमिष झवर, संदीप गोरे, गणेश हसे , बिपिन तडवी, प्रसाद आडके, बाळू उचाडे परिश्रम घेत बोरवेलची व्यवस्था केली.