धरणांच्या तालुक्यात बोअरवेलचा धडाका
By admin | Published: June 1, 2016 12:02 AM2016-06-01T00:02:29+5:302016-06-01T00:04:13+5:30
धरणांच्या तालुक्यात बोअरवेलचा धडाका
वणी : विहिरी खोदण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या फायद्याचे गणितवणी : धरणांचा तालुका म्हणून परिचित असणाऱ्या दिंडोरी तालुक्यात पाच हजारपेक्षा जास्त बोअरवेल आहेत. विहिरी खोदण्यापेक्षा बोअरवेल खोदणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांचा कल विहिरीपेक्षा बोअरवेलकडे अधिक असल्याचे पाहणीत आढळून आले आह़े
विहिरीच्या पाण्यात अधिक क्षार असल्याच्या भावनेने शेतकऱ्यांनी बोअरवेलला अग्रक्रम दिला आहे. दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, पुणेगाव, करंजवण, पालखेड, वाघाड, तिसगाव एकलहरा अशी सात धरणे व लघुपाटबंधारे, सिमेंट प्लग बंधारे याद्वारे पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था आहे. पाण्याच्या स्त्रोतांपैकी धरणातून पिण्याचे पाणी व काही धरणांतून औद्योगिक वापर वगळता पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून शेतजमिनीसाठी पाणी वापराची तरतूद आहे. दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेण्यात येते, त्यापाठोपाठ टमाटा, भाजीपाला, ऊस अशा उत्पादनांना पाण्याची मोठी गरज भासते. शेतीसाठी उपलब्ध होणारे कर्ज, वाढते बागायती क्षेत्र व नवनवीन उत्पादने घेण्याचा कल याचा समन्वय पाणी वापराशी साधताना शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. शेतीला व्यवसायाचे स्वरूप आले असून या दृष्टिकोनामुळे शेती व्यवसाय एक आव्हानात्मक बाब ठरू लागली आहे. हा व्यवसाय फुलविण्यासाठी पाणी हा आवश्यक घटक आहे. त्यामुळे बोअरवेलच्या पाणीवापराकडे उत्पादकांचा कल वाढतो. द्राक्ष शेतीबरोबर इतर उत्पादनासही क्षारयुक्त पाणी मारक असल्याच्या भीतीमुळे बोअरवेलची संख्या वाढली आहे. त्यात बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य असल्याने ही बाबही संख्येत वाढ करण्यास कारणीभूत आहे. तीनशे फुटापर्यंत बोरिंग केल्यास वीस हजाराच्या जवळपास खर्च येतो.
के सिंग पाइप पाच ते सातहजार, मोटार पाइप केबल व तत्सम खर्च तीस हजारांच्या पुढे येतो. आठ ते दहा तासांच्या अंतराने बोअरवेलमधून पाणी उपलब्ध होते, याउलट विहिरीसाठी तुलनात्मकरीत्या अधिक खर्च येतो व खोदकामास कालावधी जास्त लागतो दरम्यान पाणीवापराविषयी जनजागृती, पावसाचे पाणी साठविण्याचे कौशल्य या बाबींचा सकारात्मक विचार बोअरवेलच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यास साहाय्यभूत ठरू शकतो. (वार्ताहर)