बोरखिंड, कोनांबे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 02:17 PM2020-08-14T14:17:07+5:302020-08-14T14:17:59+5:30

सिन्नर : तालुक्यातील पश्­चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरुन वाहू लागली आहेत.

Borkhind, Konambe overflow | बोरखिंड, कोनांबे ओव्हरफ्लो

बोरखिंड, कोनांबे ओव्हरफ्लो

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यातील पश्­चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. याशिवाय स्थ्लृानिक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे.
म्हाळुंगी आणि देवनदीच्या उगमस्थ्लृानी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोनांबे धरणात पाण्याची आवक वाढली. कोनांबे धरणाची एकूण साठवण क्षमता ५४.५० दलघफू तर बोरखिंडची क्षमता ५५.६५ दलघफू एवढी आहे. सध्या देवनदीसह ठाणगावजवळच्या म्हाळुंगीला पूर आहे. कोनांबे धरणातून राबविण्यात आलेल्या भाटवाडीसह आठ गावे तसेच उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी योजनेला संजीवनी मिळणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतर्क­यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हाळुंगी नदीच्या उगमक्षेत्रात झालेल्या पावसाने ही नदी प्रवाही होऊन पाणी थ्लृेट भोजापूर धरणात पोहोचले आहे. भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे आणि कनकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. त्यामुळे या गावातील पाणीटंचाई मिटण्यासाठी भोजापूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढणे अपेक्षित आहे. भोजापूर धरणात जवळपास ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Web Title: Borkhind, Konambe overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक