बोरसे यांचा ‘आमदार आपल्या गावी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:14 PM2019-12-06T23:14:49+5:302019-12-07T00:35:12+5:30
सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.
सटाणा : सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.
गेल्या आठवड्यात शपथविधी व सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बोरसे यांनी प्रत्येक गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या गावी’ उपक्र म हाती घेतला आहे. याचा प्रारंभ बुधवारी (दि.४ ) जायखेडा जिल्हा परिषद गटातील करंजाड गावापासून करण्यात आला. या
उपक्र मादरम्यान रब्बी हंगामात शेतीच्या विजेची मोठ्या प्रमाणात समस्या असल्याचे आमदार बोरसे यांच्या निर्दशनास आले.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा केला जातो त्यामुळे कांदा लागवड रखडली आहे. काही ठिकाणी दोन-दोन महिने कृषिपंपावरील ट्रान्सफार्मर बसविले जात नसल्यामुळे जनावरांचे पाण्याअभावी हाल होत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. आमदार बोरसे यांनी तत्काळ वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांच्याशी संपर्क साधून प्रतीक्षेत असलेल्या कृषिपंपाचे ट्रान्सफार्मर बसविण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक ठिकाणी विजेची मागणी होत असेल त्या ठिकाणी जास्त क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसवावेत असेही सांगितले. दरम्यान शेती सिंचनाच्या व रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात आपला कालबद्ध कार्यक्र म राहणार आहे. असे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमदरम्यान करंजाड, भुयाणे, निताणे, बिजोटे, कोटबेल, गोराणे, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे, उत्राणे, एकलहरे, वाडीपिसोळ, जायखेडा आदी गावांना भेटी देऊन आमदार बोरसे यांनी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. याप्रसंगी करंजाडच्या सरपंच उज्ज्वला देवरे, राकेश देवरे, उपसरपंच रामदास देवरे, अरु ण देवरे, दगडू बोरसे, वसंत देवरे, प्रवीण देवरे, दिलीप शेवाळे, खंडू शेवाळे, शांताराम शेवाळे, भरत शेवाळे, निताणे येथील सरपंच रेखा देवरे, अशोक देवरे आदी उपस्थित होते. रावसाहेब देवरे, संजय देवरे, बाळू पवार, बिजोटे येथील बळीराम जाधव, पोपट जाधव, खंडू जाधव, गोपाल जाधव, कोटबेलचे बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कांदळकर ,एकलहरे येथील किरण पाटील, जायखेडा येथील सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, शिवा महाराज, बापू खुडानकर आदी उपस्थित होते.