‘बॉश’ पुन्हा पाच दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:13 AM2019-09-21T01:13:00+5:302019-09-21T01:14:32+5:30

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात दहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या महिन्यातदेखील बुधवारपासून पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्र धास्तावलेला आहे.

'Bosch' closed again for five days | ‘बॉश’ पुन्हा पाच दिवस राहणार बंद

‘बॉश’ पुन्हा पाच दिवस राहणार बंद

Next
ठळक मुद्देमंदीचा फटका : लघु उद्योजकांवरही परिणाम

सातपूर : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात दहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या महिन्यातदेखील बुधवारपासून पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्र धास्तावलेला आहे.
आर्थिक मंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून वाहन उद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अजून काही दिवस या आर्थिक मंदिला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट झाल्याने जगप्रसिद्ध बॉश कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. मागील महिन्यात दहा दिवस आणि या महिन्यात पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम १३५० कायम कामगारांप्रमाणेच ९०० हंगामी कामगारांवर झाला आहे. कायम कामगारांना पगारी सुटी असली तरी सुमारे ९०० हंगामी कामगार आणि जवळपास ६०० कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अन्य कारखान्यांतील कामगारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. उद्योग क्षेत्रावर सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: 'Bosch' closed again for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.