आर्थिक मंदीमुळे ‘बॉश’ कंपनी आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:30 AM2019-08-27T01:30:50+5:302019-08-27T01:32:00+5:30
दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते.
सातपूर : दिवसेंदिवस वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीच्या गर्तेत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या म्ािहन्यातदेखील सोमवारपासून आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असून, त्यामुळे महिंद्रासारख्या मोठ्या उद्योगांवर आधारित लघुउद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
आर्थिक मंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून वाहनउद्योग संकटात सापडला असून, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरु वात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे.
वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट झाल्याने नाशिकमधील महिंद्रा आणि बॉश कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्यात सहा दिवस बॉश कंपनीचे कामकाज बंद होते आणि चालू महिन्यात आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम वेंडर असलेल्या लघुउद्योगांवर झाला आहे. लघुउद्योगांनी सरळसरळ कामगार कपात सुरू केली आहे. कामगार कपातीमुळे कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. उद्योग क्षेत्रावर सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे या आर्थिक मंदीतून बाहेर निघण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारे केंद्र आणि राज्याकडून मंथन होत नसल्याने विशेषत: वाहन उद्योगामध्ये चिंता निर्माण झाली आहे. वाहन उद्योगा सारख्या मोठ्या उद्योगाबरोबरच त्यावर अंवलबून असलेले अन्य घटकही अडचणीत आले आहेत.
नाशिकच्या कारखान्यातील काही उत्पादन थांबवण्यात आले असून, ते नाशिक ऐवजी जयपूरच्या कारखान्यात करण्यात येत आहे. त्याबदल्यात नवीन उत्पादन होेणे अपेक्षित होते. तसेच कंपनी व्यवस्थापनाने बदलत्या परिस्थितीनुसार नवीन उत्पादन नाशिक प्लांटमध्ये आणणे आवश्यक होते. आठ दिवस उत्पादन बंद ठेवल्याने त्याचा परिणाम १३५० कायम कामगारांप्रमाणेच ९०० हंगामी कामगारांवर झाला आहे. कायम कामगारांना पगारी सुटी असली तरी ९०० हंगामी कामगार आणि जवळपास ६०० कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अन्य कारखान्यांतील कामगारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने औद्योगिक मंदीवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार संघटना