घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:42 AM2018-11-12T01:42:41+5:302018-11-12T01:43:03+5:30
मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली.
आझादनगर : मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रविवारी (दि. ४) तालुक्यातील घोडेगाव शिवारात टँकरमधून स्पिरीट चोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीस विशेष पोलीस पथकाने
छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोटी ४१
लाख ३८ हजार ५०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ए. बी. क्षीरसागर यांनी तालुका पोलिसांत
फिर्याद दिली होती. मुख्य संशयित फरार होते.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले व सहकाºयांनी शनिवारी राकेश छगनलाल जैन (२९) यास धुळे व निखिल प्रेमचंद पारस यास तालुक्यातील निंबायती येथून अटक केली. अधिक तपास सहायक
पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.